0
BY - विशेष प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

गेल्या काही महिण्यांपासून गुटखा विक्रीची बातमी झळकत असून शासनानी या गंभीर बाबीकडै अद्दयाप लक्ष वेधले नाही.टक्केवारीच्या सुरात सामावून गेलेली पोलिस यंत्रणा हप्त्यासमोर झुकली आहे.गुटखा डिलर पोलिसांना आपल्या बोटावर नाचवत असून शासनाने त्या गुटखा डिलरला सुट दिली आहे.सक्षम पोलिसाची आता खरी गरज मुरबाडला असून जो दोन नंबरचा धंदा बंद करू शकेल नाहीतर मुरबाडचा गुटखा युवकांच्या जीवावर बेतून त्यांना चांगलाच फटका देऊ शकतो हे गणित नाकारता येणार नाही.
ठाणे ग्रामीण अधिक्षीक याकडे दुर्लक्ष करित असून खालपासून वरपर्यंत हप्ते मोजले जात आहे.गुटखा डिलर मोठया गाडयात थाटात फिरून गुटखा विक्री करित आहे परंतू त्याला पकडण्यासाठी सक्षम पोलिस मुरबाडमध्ये नसल्याचे दिसून येत आहे.एकीकडे सरकार भ्रष्टाचार संपविण्याच्या गोष्टी बोलते तर दुसरीकडे शासनाचेच अधिकारी हप्त्यावर आपले जीवन जगत आहे.हवालदारपासून अधिक्षीकांना हप्त्याची गुठरी पाहोचत असून बेशुमार गुटखा विक्री धंदा मुरबाडमध्ये केला जात आहे.याकडे ठाणे पोलिस अधिक्षीक यांना सदर बाब माहिती नाही की माहिती असतांना दुर्लक्ष असल्याचे बहाणा करित आहे यावर जनतेला प्रश्‍न पडला आहे.सदर बाब हप्तेबाजीच्या सुराची असून याकडे आता मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र पथक नेमून गुटखा विक्री डिलर,किराणा दुकानदार,पान टपरी,व बोगस गुटखा गोडाऊनमध्ये धाड टाकावी अशी लेखी मागणी येथिल सामाजिक संघटनेनी व नागरिकांनी केली आहे.

Post a comment

 
Top