0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुक्यात 2016 ते 2018 च्या कालावधीत मोठया प्रमाणात रॉयल्टी चोरी करण्यात आली असल्याचे माहिती समोर आली आहे.गेल्या दोन वर्षापासून रॉयल्ती चोरीवर युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी लक्ष ठेऊन होती त्याकालावधीत प्रशासनाने त्यांना रॉयल्टी चोरी म्हणून दंड ठोठावला आहे.त्यामध्ये मुरबाड व इतर भागातील नामवंत व्यक्ती तसेच कंपनी धारक,ठेकेदार यांचे नाव समोर आले आहे.आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह ने आढावा घेत पाठपुरावा केला व संबंधीत मुरबाडचा रॉयल्टी चोर यांची माहिती अखेर आमच्या हाती लागली.त्या माहितीचा जनतेसमोर पर्दाफाश केला जाणार असून सदरहू रॉयल्टी चोर असा शिर्षक लेखणीच्या माध्यमातून असणार आहे.
" नाव मोठं अन लक्षण खोटं,रॉयल्टी चोरून भरत होता पोटं " अशा अनुषंगाने मुरबाडच्या प्रशासकीय तिजोरीत हा दंड जमा करण्यात आला असूनसदरहू या दंडाला कोठे वापरण्यात आले की नाही अशी माहिती सध्या समोर आली गेली नाही.येत्या दोन दिवसानंतर युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीवर त्या रॉयल्टी चोरांची माहिती वाचता व पाहता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a comment

 
Top