0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया ट्विटवरच व्यक्त केली आहे. भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नसून आम्ही कॉंग्रेस आणि शिवसेनेबरोबरच सरकार स्थापन करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांचे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे व खोटे असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, अजित पवार यांनी आज ट्विटवर सक्रीय होत काही ट्विट केले. ज्यामध्ये आपण अजुनही राष्ट्रवादीतच असून शरद पवार हेच आपले नेते असल्याचे म्हटले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी राज्याला स्थिर सरकार देईल असही अजित पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे. काळजी करण्याचे काहीही कारण नसून सर्व काही लवकरच ठीक होईल त्यामुळे सगळ्यांनी संयम ठेवावा असं आवाहन त्यांनी केले आहे.

Post a comment

 
Top