0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – परंडा |
परंडा येथील रा.गे.शिंदे महाविद्यालयाकडून गेल्या आठवड्यापासून अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.त्यामध्ये शिराळा ग्रामपंचायत कार्यालयास भेट व नंतर परंडा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम (दि-२५) रोजी आयोजित करण्यात आली होती.यामुळे शिंदे महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रा.विशाल जाधव,प्रा.मांजरे सर व महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.सौ.दिपा सावळे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Post a comment

 
Top