0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
उद्या दुपारपर्यंत राज्यातील सत्तास्थापनेबाबत चित्र स्पष्ट होईल हे मोठे विधान शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊतांनी केले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून जवळपास महिना होत आला. मात्र अजूनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसठी जुळवाजुळव केली जात आहे. अशातच राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊतांनी दिल्लीत बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल असा विश्वास शिवसेना संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल याची आठवणही त्यांनी करु दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केले. पंतप्रधानांना एखादा नेता भेटला तर काहीतरी काळंबेर आहे असे समजण्याचे कारण नाही.


Post a comment

 
Top