0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील आदर्श व सक्षम स्वयंसहाय्यता बचत गटांना प्रोत्साहित करणेसाठी राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कार योजना जिल्हा व तालुका स्तरावर सुरु करण्यात आलेली आहे.स्वयंसहाय्यता बचत गटांचे कार्य,उपक्रम याबाबत दिलेली प्रसिध्दी,प्रसिध्द केलेल्या बातम्या,फोटो फिचर्स,लेखमाला इत्यादी विचारात घेऊन एका सर्वोत्कष्ठ पत्रकारास प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.या सर्वोत्कृष्ट पत्रकारास पत्रकारांची निवड जिल्हास्तरीय  परितोषिक निवड समिती करेल.या पुरस्कारासाठी अर्ज प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,ठाणे .पी.डब्ल्यू.डी.स्टेशन रोड या कार्यालयाकडे करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a comment

 
Top