0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – चेन्नई |
भारतात निवडणूक प्रक्रियेंमधील महत्त्वाच्या सुधारणांसाठी ओळखले जाणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं (T N Seshan died) रविवारी (10 नोव्हेंबर) निधन झालं. त्यांचं वय 86 वर्षे होतं. शेषन (T N Seshan died) त्यांच्या शिस्तबद्ध कामासाठी ओळखले जात होते. त्यांच्या याच स्वभावाने अनेक राजकारण्यांना कायद्याची जरब बसवली.शेषन यांनी निवडणुकीसंबंधित कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली. यात त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यापासून बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांवरही कारवाईचा बडगा उगारला. बिहारमध्ये 4 टप्प्यांमध्ये निवडणूक घेणारे ते पहिले निवडणूक आयुक्त होते.

Post a comment

 
Top