BY -
युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगर कॅम्प नं :-४ कुर्ला कॅम्प परिसरातील
जलकुंभा जवळ रात्री 10.30 वाजण्याच्या दरम्यान
भरत नावाच्या इसमावर गोळीबार झाला. भरत लष्कर(वय-२२), याच्या डोक्यात
गोळी लागली असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सहायक पोलिस आयुक्त
तेरे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करण्यात आला. गोळीबार
कोणी व कोणत्या कारणातून झाला. याचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.
Post a comment