0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले पराक्रम संघर्ष व  संस्कार याची प्रतीके आहेत. ती जतन करण्यासाठी किल्लेकर्स तर्फे सलग ६ व्या वर्षी वसंत विहार, क्लब ग्राउंड, ठाणे येथे शनिवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायं ५ वा मातीचे किल्ले कार्यशाळा व सायं ५ ते ६:३० वा प्रमुख पाहुणे श्रीमंत.रोहितराजे देशमुख पवार, राजकुमार महाराज, सुरगाणा नाशिक यांच्या उपस्थितीत स्थलदुर्ग, भुईकोट ,जलदुर्ग या मातीच्या किल्लांचे प्रदर्शन व दांडपट्टा, तलवार बाजी व लाठी काठी ,मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, आयोजित करण्यात आले आहे
 या मातीचे किल्ले कार्यशाळेत ठाणे महानगर परीसरातील १० शाळानं मधून १३ ते १४ वयोगटातील इयत्ता ७ वी, ते ९ वीतील १०० मुले ,मुली सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेत आयोजकांतर्फे माती आदी साहित्य देण्यात येणार आहे
त्याच दिवशी ९ नोव्हेंबर रोजी सायं ७ ते ९ कोरम मॉल, ठाणे येथे किल्लेकर्स तर्फे वय वर्ष ३० पुढील वयोगटातील ३० महिला पारंपारिक फॅशन शो, , माता भगिनी पारंपारिक पोशाखात आधुनिक शैलीत रॅप वर चालून इतिहास व ऐतिहासिक स्थळे आणि गड किल्ले याची माहिती पुढच्या पिढीला का हवी?हा संदेश देणार आहेत.महाराष्ट्रातील १०० ऑनलाईन स्पर्धकांनी भाग घेतलेल्या  फोटोग्राफी,चित्रकला कविता निबंध लेखन स्पर्धा निकाल बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे श्रीमंत.रोहितराजे देशमुख पवार, राजकुमार महाराज, सुरगाणा नाशिक,  अक्षय चव्हाण सह संस्थापक लाव्यू हिस्टरी.इंडिया कॉम डॉ. संदीप दहिसरकर  पुरातत्व व इतिहासकार, सतीश आणि समीर देसाई जिल्हाप्रमुख संभाजी ब्रिगेड, कल्पतरू व्ही.पी., वाणिज्य प्रमुख व प्रकल्प प्रमुख, के कुमार- अध्यक्ष वसंत विहार सीएचएस आणि संस्थापक पुरोगामी ठाणे निवासी संघटना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे असे आपल्या प्रसिद्धीपत्रकात किल्लेकर्स संस्थापक मयुरा वाघोळकर   पाडळे यांनी म्हटले आहे 

Post a comment

 
Top