0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे  |

पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजपचे शिक्कामोर्तब केला आहे. भाजपकडून मोहोळ अर्ज दाखल करणार आहेत. महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यांच्या निवडीमुळे अनेक वर्षांनी कोथरूड भागातली व्यक्ती महापौर असणार आहे. सौम्य, मितभाषी आणि चाणाक्ष असलेल्या मोहोळ यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने सभागृह चालवण्यास अडचण येणार नाही असेही मत जाणकार व्यक्त करत आहेत. महापौरपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक 22 नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी सकाळी 11 ते दुपारी एक या दरम्यान आहे. पालिकेमध्ये भाजपकडे निर्विवाद बहुमत असल्याने शिवसेनेने विरोधकांना साथ दिली, तरी सोमवारी अर्ज भरणारा भाजपचा उमेदवारच महापौरपदाच्या खुर्चीत बसणार, यात शंका नाही.

Post a comment

 
Top