0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
जगभरातील पन्नासहून अधिक पर्यटन संस्था, व्यावसायिक कंपन्या आदींसमवेत बी टू बी बैठकांच्या माध्यमातून संवाद साधत आज लंडन येथील वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट प्रदर्शनात महाराष्ट्र पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने व्यापक उपाययोजना करण्यात आल्या. लंडन येथील पत्रकारांसाठी पत्रकार परिषद आयोजित करुन त्यामाध्यमातूनही महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे तसेच पर्यटन संधींची त्यांना माहिती देण्यात आली. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल यांनी या सर्वांशी संवाद साधत चला महाराष्ट्राकडेचा संदेश दिला.
दिवसभर राबविण्यात आलेल्या या विविध कार्यक्रमांना पर्यटन व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलसमोर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही पर्यटकांनी प्रतिसाद दिला. स्टॉलला भेट देत जगभरातील हजारो पर्यटकांनी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर यांनी पर्यटकांशी संवाद साधत महाराष्ट्रातील पर्यटन वैभवाची त्यांना माहिती दिली.  

Post a comment

 
Top