0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – धुळे |
येथिल कवियित्री सौ. मंगला मधुकर रोकडे यांना दि.३ नोहेंबर२०१९ रोजी 'कामगार चळवळीचे जनक रावसाहेब नारायण मेघाजी लोखंडे गुण गौरव पुरस्कार'२०१९ मेहकर जि.बुलढाणा येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.बुलढाणा येथिल महात्मा जोतिराव फुले सेवा प्रतिष्ठान, भारतीय माळी महासंघ, महाराष्ट्र माळी कर्मचारी महासंघ व विश्वरत्न राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाज वधु-वर परिचय मेळावा, सत्यशोधक सामुहिक विवाह सोहळा व प्रज्ञावंत गुण गौरव सोहळ्याचेआयोजन करण्यात आले. मेहकर येथिल वेदिका लॉन च्या सभागृहात हा शानदार सोहळा संपन्न झाला. खासदार राजीवजी सातव, खासदार अमोल कोल्हे ह्या मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सौ. मंगलाताईं रोकडे यांना  समाज प्रबोधन पर लेखनासाठी व अभिमानास्पद कार्यासाठी  तसेच त्यांच्या निरपेक्ष सेवेचा गौरव म्हणून हा बहुमान प्रदान करण्यात आला. जोतिरावांनी लावलेली सामाजिक, साहित्यिक,आणि शैक्षणिक ज्योत सदैव तेवत रहावी म्हणून संस्थेचे अध्यक्ष रमेशजी हिराळकर सर यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती किरण इंगोले यांच्या सुविध्य पत्नी रुपाली ताई इंगोले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सौ. मंगलाताई रोकडे यांनी हा बहुमान स्विकारला. महाराष्ट्रभरातून सौ.मंगला ताईंचे अभिनंदन होत आहे.


Post a comment

 
Top