0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |

गेली 58 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय कडून हौशी कलाकारांसाठी मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला कल्याण केंद्र अत्रे रंगमंदिर मधून सुरवात करण्यात आली. ठाणे ते कर्जत तसेच रायगड मधून देखील नाट्य संस्थांनी यात सहभाग घेतला आहे. डोंबिवली मधील तिहाई कलासाधक संस्थेच्या समीर मोने लिखित आणि मिलिंद अधिकारी दिग्दर्शित "कबुल है" या नाटकाने शुभारंभ करण्यात आला. 2 जानेवारी पर्यंत कल्याण केंद्र प्राथमिक फेरीत 28 नाटके बघण्याची संधी कल्याण डोंबिवली नाट्य रसिकांना मिळणार आहे. कल्याण केंद्रातील स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ नाटककार देवेंद्र यादव, ज्येष्ठ लेखक दत्तात्रय सावंत, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती निसळ हे करणार आहेत. या उदघाटन सोहळ्याला कल्याण तहसीलदार दीपक आकडे, अभिनेता मयूर खांडगे, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तसेच आचार्य अत्रे रंगमंदिर व्यवस्थापक माणिक शिंदे व सावित्रीबाई फुले नाट्यगृह व्यवस्थापक दत्तात्रय लदवा हे देखील आवर्जून उपस्थित होते. स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याचे सूत्र संचालन पत्रकार निवेदक प्रणव भांबुरे यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष व स्पर्धा समन्वयक शिवाजी शिंदे, अनिल ठाणगे, संजय गावडे तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उदघाटन सोहळ्यासाठी विशेष मेहनत घेतली

Post a comment

 
Top