0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शिवसेना-भाजप हे एकमेकांचे मित्र पक्ष आहेत. त्यामुळे कोणी कोणाला खोटं ठरवू नये, एकमेकांचे ऐकावे, मी एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सांगतो, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सेना-भाजपला दिला. अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. देशातील सर्व नागरिकांनी याचे स्वागत करून शांतता राखावी. हा निर्णय एका राज्याचा नसून संपूर्ण देशाचा आहे. भाजप-शिवसेनेने सरकार बनवावे, आम्ही विरोधात कधी बसणार याची वाट बघत आहोत, असेही पवार म्हणाले.

Post a Comment

 
Top