0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
माझ्या पक्षातील सहकाऱ्यांना मी काही पटवून दिलं तर ते माझं म्हणणं नाकारतात असा माझा अनुभव नाही, त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्यात माझा हात आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही, तसेच वेगळं मत असेल तर ते पक्षाच्या बैठकीत मांडायला हवं, कुणी एक व्यक्ती पक्षाचं धोरण स्वीकारु शकत नाही असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपनं संकेतांना हरताळ फासून सत्तास्थापना केली, राज्यपालांनी सांगितले त्याप्रमाणे बहुमत सिद्ध करताना सर्व स्पष्ट होईल. असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनी धीर दिला आहे.तसेच अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, त्यांच्याशी बोलणं झालं नाही असही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.

Post a comment

 
Top