0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही सोबत होते. शरद पवारांनी आपण पुन्हा सोनिया गांधी यांना भेटणार असल्याची माहिती यावेळी दिली. पुढच्या भेटीचं ठरलं आहे असं पवार म्हणाले.शरद पवार म्हणाले, सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी माहिती देण्याचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आज भेट घेऊन माहिती दिली. शिवसेना सातत्याने आपलं मुखपत्र सामनातून सातत्याने भाजपविषयी लिहीत आहे. आम्ही चर्चा करुन पुन्हा भेटण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यावर ही चर्चा झाली आहे. सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. मुंबईमधील नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. आम्हाला सरकार बनविण्यासाठी आमच्याकडे संख्या नाही, असं पवारांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

Post a comment

 
Top