0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड नगरपंचायत अंतर्गत येणार्‍या गणेशनगर येथील स्वामी नरेंद्र रेसिडेन्सी इमारत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती त्यावर मुरबाड तहसिलदार यांनी चौकशीचे आदेश देऊन तलाठी यांना पंचनामा करण्यास सांगितले असता तलाठी पंचनाम्यात शर्तभंग करण्यात आले असल्याचे शेरा मारण्यात आल्याने संबंधित मुरबाड नगरपंचायत यांना त्यांना सर्व कागदपत्रे,प्लॅन,डिपी प्लॅन,परवानग्या व इतर महत्वपुर्ण कागदपत्रे अवगत करण्याचे तीन पत्र दिले तरीही मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी व संबधित कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही त्या प्रकरणाला साटेलोटे करून दाबण्यात आले यावर आता तक्रारदारांनी सर्व इमारत शर्तभंग असून शासकीय अटीतटीचे पालन केले गेले नसून नागरिकांची फसवणूक करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार्‍या पत्रकात म्हंटले असून ठाणे नगररचनाकार यांच्या मार्फत स्वतंत्र पथक नेमून आपल्या अधिरित्याखाली चौकशी करून इमारतीला सिल करण्यात यावे अशी मागणी केली असून केंद्र शासन,राष्ट्रपती यांना संबधित तक्रारी अर्ज देण्यात येणार असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.

Post a comment

 
Top