0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
माळशेजघाट धोक्याचा घाट येथे शेकडो अपघात घडलेला 29 जणांचा एकाचवेळी एस.टी बस संरक्षण भिंतीचा कटाडा तोडून दरीत पडून मृत्यु झाल्याची घटना घडली होती याच संरक्षण भिंतीचा काम दगडगोटे करून निकृष्टपणे सुरू आहे.
     अधिकारी ठेकेदार भ्रष्टाचार करण्यास राष्ट्रपती राजवट काळातही घाबरले नाहीत त्याचा पुरावा फोटो,व्हिडीओ देत आहे.माळशेजघाटातील छत्रीपॉईंट येथे दगडगोटे भरून केलेल्या निकृष्ट दर्जाच्या संरक्षण भिंतीच्या कामाला जबाबदार असलेल्या नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता,उपअभियंत, शाखा अभियंता यांना निलंबित करावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार,राजेश भांगे यांनी केली आहे.माळशेजघाटात अंधाराच्या सावक्यात अशी कामे केली जातात.मुरबाड तालुका ठेकेदार,अधिकारी यांचा भ्रष्टाचारी अड्डा बनला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जे केले तेच भाजपा सेनेने आपल्या सत्ता कालावधीत केले त्यांची भिती अधिकारी,ठेकेदार यांना राहिली नसल्याने त्यांनी राष्ट्रपती राजवटीत निकृष्ट कामे सुरूच आहेत.ठाणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देऊन खोटी बिले काढली आहेत.(दुसर्‍या भागात 25/15 हेड मधील खोटी बिले कामे गायब वाचायला विसरू नका - संपादक)


Post a comment

 
Top