0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
गेल्या काही दिवसांपासून सत्ता स्थापनेचा प्रश्न रखडलेला आहे. आता हा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर सकाळी बोलणारा, एवढीच प्रतिक्रिया देऊन ते बाहेर पडले. यामुळे आज सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच गुरुवारी संजय राऊतांनीही शुक्रवारी सर्व काही स्पष्ट होईल असे संकेत दिले होते.गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिल्लीमध्ये बैठका पार पडल्या. आता दोन्ही पक्षाचे सर्व नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहे. शरद पवार हे मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी दाखल झाले. यानंत रात्री उशीरा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत 'मातोश्री'वरून शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास सव्वा तास बैठक झाली. या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेविषयी महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. 

Post a comment

 
Top