0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नांदेड |
गेल्या पंधरा दिवसात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहे. त्यांनी लोहा तालुक्यातील जानापूरी येथे शेतीवर जाऊन पाहणी केली. यावेळी उद्धव साहेब शेतकऱ्यांना जगवा असा आर्त टाहो शेतकऱ्यांनी फोडला.गेल्या पंधरा दिवसात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजही शेतात गुडघाभर पाणी असून, पिकावर बुरशी चढली आहे. या भयावह परिस्थितीत शेतकरी हैराण झाला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नांदेडला गेले होते. तेथे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर मी आपल्या सोबत आहे असा विश्‍वास दिला. यावेळी शेतकऱ्यांना जगवा असा टाहो शेतकऱ्यांनी फोडला.

Post a comment

 
Top