0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर आश्चर्य म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. राज्यातील राजकारणाचे चक्र अचानक फिरल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर होती. मात्र राजकारणाची चक्रे अचानक फिरली आणि सर्वांनाच धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपली प्रतिक्रिया शपथ घेतल्यानंतर दिली. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली आहे. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे  राज्यात राष्ट्रपती  राजवट लागू झाली. राज्यात आज अनेक गंभीर प्रश्न उभे असताना त्यांच्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

Post a comment

 
Top