0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाडच्या धर्तीवर कित्येक कलाकार तयार झाले असून कोणी गायक होतो तर कोणी सिनेकलाकार तर कोणी क्रिकेटर त्याच पाठोपाठ आता मिस यूनिवर्सची भर पडली आहे.
मुरबाड शहरातील भाग्यश्री अजय तोंडलीकर हीने नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या मिस्टर अ‍ॅन्ड मिस यूनिवर्स कॉम्पिटीशन मध्ये 
भाग्यश्री हिने बाजी मारून मुरबाड तालुक्याचे नाव उजवल करून अजून त्यात भर पाडल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबर्इ मध्ये झालेल्या ऑडिशन मध्ये दमदार परफॉर्मेंसवर भाग्यश्री ने टॉप 15 मॉडल्स मध्ये आपली धमक बनवून फायनल मध्ये मिस यूनिवर्स किताबाची बाजी मारली आहे.
तीच्या या कामगिरला मुरबाड तालुक्यातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.माझ्या या कार्याला माझ्या घरच्यांचा मोठा वाटा असल्याचे भाग्यश्री हिने सांगितले.तसेच भाग्यश्री तोंडलीकर हिला नवीन येणार्‍या वेब सिरीज मध्ये काम करण्याची सुध्दा संधी भेटल्याचे यावेळी भाग्यश्रीने सांगितले.

Post a comment

 
Top