0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली |
राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाने आता धोकादायक पातळी ओलांडली आहे. दिल्लीत काही ठिकाणी पाऊस झाला मात्र, त्याचाही या प्रदूषणावर काहीही परिणाम झालेला नाही.उलट पावसामुळे धुरकं आणखी वाढलं आहे. सध्या दिल्लीमध्ये या धुरक्यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. या धुरक्यामुळे काही अंतरावरील वस्तू, इमारती, रस्तेही दिसेनासे झाले आहेत दिल्ली-NCR च्या(Delhi NCR)अनेक भागांमध्ये AQI म्हणजेच एअर क्वॉलिटी इंडेक्स लेव्हल 1000 च्या वर पोहोचली आहे. दिल्लीच्या आनंद विहार परिसरात AQI 1,683 वर पोहोचला. तर पटपडगंज परिसरात 999 AQI ची नोंद करण्यात आली. तसेच, सत्यवती कॉलेज परिसरात 961 AQI ची नोंद झाली.

Post a comment

 
Top