0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘किंगमेकर’ म्हटलं जातं, त्यात काही वावगं नाही. शरद पवारांनी काँग्रेससोबतची चर्चा पुढे ढकलल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महासेनाआघाडी सरकार लांबणीवर पडल्याचं चित्र आहे. शरद पवार यांनी चर्चेसाठी आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना केल्यामुळे सरकार स्थापना पुढे ढकलली गेली.काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी या संदर्भात माहिती दिली.

‘काँग्रेस कार्यकारिणीची काल दिल्लीत बैठक झाली. नेमकं काय करावं? याचा निर्णय होत नव्हता. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत सोनिया गांधींनी तीन तास चर्चा केली. त्यानंतर शरद पवारांशीही त्या बोलल्या. दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज चर्चा करु, गरज पडल्यास शिवसेनेशीही चर्चा करु, असं पवारांनी सांगितल्याची माहिती माणिकराव ठाकरेंनी दिली.‘आम्ही तयारीत होतो, पण पवारांनी सूचित केल्यामुळे अंतिम निर्णय घेतला नाही. पवारांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीतील नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल आज मुंबईला जाणार होते.परंतु आजच्या ऐवजी परवा भेटू, असं नंतर पवारांनी सांगितलं.त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतील नेते आज शरद पवारांची भेट घेणार नाहीत’, असं माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Post a comment

 
Top