0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - नवी  मुंबर्इ |
 " मनी धरू एकच ध्यास-समाजाचा करू विकास " या प्रेरणेतून समाजाची नवशिक्षीत पिढीच्या विवाह जुळणीची समस्या ध्यानी घेऊन वैवाहिक जीवनाचा सहप्रवास हा सुखाचा होवा या दृष्टिकोनातून वधु-वर परिचय मेळाव्यांचे आयोजन केले जाते.आज महाराष्ट्रात कुणबी समाजाने आपल्या समाजाच्या हितासाठी कित्येक उपक्रम राबिवले त्यामध्ये शिक्षणात मदतीचा हाथ,आरोग्य सेवा मोफत,गोरगरिबांना आर्थिक स्वरूपात मदत तर कधी विवाह इच्छुक वधु-वरांना एकत्रित आणून त्यांना आपले विचार जाणून घेऊन नाविण्य उपक्रम राबविला जातो.ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघ ठाणे यांनी मिळवला असून मागील बारा वर्षापासुन कुणबी समाजाच्या वधु-वरांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आले असून चालूवर्षाचा हा 27 वा मेळावा आहे.आजपर्यंत सहा हजाराच्या आसपास विवाह इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी केली असून सुमारे साडे चार हजार जणांचे विवाह जुळाले आहे.एका छताखाली सुमारे 300 ते 400 मुले मुली एकावेळी उपस्थित राहत असल्याने हे मेळावे समाजाच्या विवाह इच्छुकांसाठी वरदान ठरत आहेत.अत्यंत उच्य विद्दयाभुीषत मुले मुली येथे नोंदणी करतात.ठाणे कुणबी समाज सेवा संघाचे ठाणे शहर आणि नवी मुंबर्इमध्येच 2000 कुटुंब सभासद असून दोनशे निस्पृह सेवाभावी सक्रिय कार्यकर्त्यांची फळी हे सेवा संघात सामर्थ्य आहे.सेवा संघातर्फे स्नेहसंमेलन,पार्यावरण सहल गुणवंतांचा,निवृत्तांचा सत्कार,व अन्य असे उपक्रम राबवले जातात त्यामुळे ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघ जिल्हयाच्या नकाशात मात्र कुणबी समाज उमटला आहे.
ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघ ठाणे नवी मंबर्इ शहरात कार्यरत आहे.आपल्या जीवनात सुयोग्य जीवनसाथी मिळावा हा उद्देश प्रत्येक वधू वरांचा असतो त्या उद्देशाला साक्षात्कारात घडविण्याचा खरे कार्य ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघाने केेले आहे.या वधू वर परिचय मेळाव्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून कुणबी ज्ञाती बांधवांसाठी सामाजिक बांधिलकी जपत येत्या वर्षीही ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघाच्या वतीने वधु-वर सुचक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून येत्या पुढिल आठवडयात रविवार दि.17.11.2019 रोजी सेंट लॉरेन्स हायस्कूल हॉल,गोल्डन सिल्व्हर पार्क समोर,मुलुंड चेक नाक्या जवळ वागळे इस्टेट रोड,ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.तरी सर्व इच्छूक कुणबी समाज बांधवांनी, वधु-वरांनी नोंदणी करावयाची असल्यास आमच्या कार्यालयास तसेच आमच्या 9225132271/9833527056 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघाचे अध्यक्ष मोहन लक्ष्मण पाटील,समिती प्रमुख वसंत काळूराम पाटील यांनी आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून केले आहे.

Post a comment

 
Top