0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
आम्ही लेखिका' या अ.भा.संस्थेची संचालिका आणि ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा, प्रा पद्मा हुशिंग यांच्या " सृजा " काव्यसंग्रह आणि " नाळ " कथासंग्रह या दोन पुस्तकांचे पाणिनी प्रकाशने सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ विजयाताई वाड ,सुप्रसिद्ध कथालेखिका माधवी घारपुरे ,सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे ,आणि आम्ही लेखिका संस्थेचे अध्यक्ष .मोहन कुलकर्णी, प्रसिद्ध चित्रकार सतीश खोत ,ठाणे भूषण नारायण तांबे , पुष्पा जोशी इ. मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीत दि.२ नोव्हेंबर रोजी शहनाई हॉल ,ठाणे येथे कौटूबिक सोहळ्यात थाटामाटात प्रकाशन संपन्न झाले. या वेळी आ संजय केळकर उपस्थित होतेया वेळी "शब्द शब्द जपून ठेव" हा कवी आणि गीतकार अरुणा म्हात्रे आणि सुप्रसिद्ध गायिका अनुजा वर्तक यांचा सुरेल कार्यक्रमाने सोहळ्याची शान अजूनच वाढवली.डॉ विजयाताई वाड या ' सृजा ' काव्यसंग्रहाबद्दल म्हणाल्या की "सोपे लिहीणे किती कठीण आहे ते कागदावर अक्षरे उतरवू लागतात तेव्हा कळते.सुबोधता ,सहजता आणी निर्मळता स्वभावात असेल तर ती कवनात आपोआप उतरते.ही सहजता प्रा पद्मा हुशिंग यांच्या काव्यात जागोजागी दिसून येते.माधवी घारपुरे 'नाळ'कथासंग्रहाबद्दल म्हणाल्या की'वाचकाला आपल्याकडे आकर्षून घेण्याचे कसब ज्या साहित्यात असते ते उत्तम साहित्य असतं 'अशा उत्तम साहित्यात प्रा पद्मा हुशिंग यांच्या 'नाळ'चा समावेश होतो'सर्व मान्यवरांनी काव्यसंग्रह आणि कथासंग्रहास शुभेच्छा देणारी आणि या दोन्ही पुस्तकांचे विशेष सांगणारी भाषणं झाली.या प्रकाशन सोहळ्याचे एक वेगळेपण म्हणजे छोट्याशा ग्रंथ दिंडीत घरातील लहानमुलांनी ग्रंथ व्यासपीठाकडे सुपूर्द केले.या कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन अश्विनी कानोलकर तर आभार प्रदर्शन अॅड.मंजिरी हुशिंग यांनी करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a comment

 
Top