0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज मोठा दिवस  ठरला. विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला (Maharashtra Uddhav Thackeray won floor test) आहे. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले.  महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. सभागृहातील कामाकाजादरम्यान भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवर टीका केली.
याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका खोडून काढत भाजपचा समाचार घेतला. जर छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हो मी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेईल, हो मी आई वडिलांची शपथ घेतली मी पुन्हा घेईल. जर हा गुन्हा असेल तर तो एकदा नाही, मी दहा वेळा नाही, प्रत्येक जन्मात केल्याशिवाय राहणार नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.या सभागृहाने माझ्यावर जो विश्वास त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी इथे आहे. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत, त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतो आहे. असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Post a comment

 
Top