0
BY - ( लेखक : कुणाल शेलार ) - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्हयाला जे जिल्हाधिकारी लाभतात ते संपुर्ण जिल्हयाची काया पालट करूनच दाखवतात हे जिल्हाधिकारी श्री.मेहेंद्र कल्याणकर असताना देशपातळीवर ठाणे जिल्हा तांत्रिक सोशल मिडीयाच्या माध्यमातून उत्तीर्ण श्रेणीत विजय संपादन केल्याचे आपण पाहिले आहे.त्यानंतर ठाणे जिल्हयाला जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर लाभतात आणि प्रशासकीय भुमिकेतील जागता पाहरा याचे उदाहरण म्हणजे आपल्या निर्भिड आणि विश्‍वसनीय कामगिरीतून त्यांनी सर्वांना दाखवून दिले आहे.त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक नागरिकांना आदराने सन्मान मिळत असून विविध अशा समस्यांचा बोजारा आपल्या हाती गेऊन तक्रारीचे निराकरण करणे त्यांची ध्येय धोरणे वैभवशाली ठरत आहे.
त्यांच्या चालू कारकिर्दीत त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्यांना डोळयासमोर ठेऊन समस्यामुक्त करण्याचे काम करत आहेत.वेळेला महत्व आणि प्रशासकीय निर्भिड बाणा त्यांच्या कार्यप्रणालीतून दिसून येत असून नेहमी हसरा चेहरा समोर असतांनाही परखड मत आणि सत्याची धार त्यांच्या कार्यातून दिसून आली आहे.कोणतीही तक्रार त्यावर पाहणीशा करून चौकशीचे निर्देश सोडून अन्याय होणार्‍यावर न्याय मिळवून देण्याची त्यांची कार्यशैली त्यांना प्रशासकीय भुमिकेतून माणूसकी आणि सक्षम अधिकारी यांची जागृतता असल्याचे सिध्द करून देत आहे.भ्रष्टाचार हा कोठे होत नाही परंतू भ्रष्टाचार कोण थांबवणार यासाठी कोणी तरी पुढे आला पाहिजे त्यासाठी सक्षम प्रशासक लागतो जसे तुकाराम मुंडे तसेच ठाणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे आहेत.
राज्याचे ते एक मुख्यमंत्री असतात आणि जिल्हायाचे जिल्हाधिकारी हे मुख्यमंत्री असतात अशा जिल्हयाच्या मुख्यमंञ्यांनी आपली प्रशासक भुमिका जनतेच्या कल्याणकारीसाठी घेऊन न्याय देण्याचा उच्चांक गाठतांना प्रत्येक जिल्हयात आपणास पाहायला मिळतो असेच ठाणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर आहेत की सर्वसामान्य जनतेसाठी प्रशासकीय सेवेतून आपले कार्य करतांना दिसतात.(क्रमशः भाग-1)

Post a comment

 
Top