0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना आता आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. भाजपने अंधारात पाप केलं असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. त्याला भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं. शिवाय केंद्रातून कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. मात्र रवीशंकर प्रसाद यांनी टीकेदरम्यान छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत, छत्रपती संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना नाराजीचे खरमरीत पत्र लिहिलं आहे. रवीशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करायला हवा होता, परंतु शिवाजी शिवाजी असा उल्लेख केल्याने संभाजीराजेंनी पत्रातून नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीराजे यांनी प्रसाद यांना छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करण्याचा सल्ला दिला.

Post a comment

 
Top