0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
महासेनाआघाडीचे नेते ओल्या दुष्काळासंदर्भात राज्यपालांना भेटणार होते. त्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र जमत होते, मात्र ऐनवेळी ही भेट रद्द झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे.याबाबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भेट रद्द झाल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदेंनी जारी केलेल्या पत्रकानुसार शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस या तीनही पक्षांचे एक शिष्टमंडळ आज दुपारी ४.३० वाजता राज्यपालांची भेट घेणार होते.मात्र,तीनही पक्षांचे  महत्वाचे नेते आणि आमदार ओला दुष्काळ पाहणी दौरा,नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी तसेच निवडणूक आयोगकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करणेसाठी आपापल्या मतदारसंघात आहेत.त्यामुळे माननीय राज्यपाल महोदय यांची आजची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.  

Post a comment

 
Top