0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
अयोध्या वाद आणि कर्नाटकच्या १७ अपात्र आमदारांवर निर्णय सुनावल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आज तीन आणखी मोठ्या प्रकरणांवर आपला निर्णय सुनावणार आहे. तसेच दिल्लीच्या साकेत न्यायालयात मुजफ्फरपूर प्रकरणी निर्णय सुनावला जाऊ शकतो. राफेल आणि सबरीमाला प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सकाळी साडे दहा वाजता निर्णय सुनावला जाईल. याव्यतिरिक्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' विधानावर त्यांच्यावर कारवाई होणार का ? यावर सुनावणी होईल.

Post a comment

 
Top