0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
झपाटय़ाने वाढलेल्या शहरीकरणात माती, दगड आणि जागा मिळणे दुरापास्त झाले असताना, महाराष्ट्रात वर्षानुवर्षे आपल्या संस्कृतीत रुजलेले ऐतिहासिक किल्ले पराक्रम ,संघर्ष व संस्कार याची प्रतीके आहेत. ती जतन करण्यासाठी मॉर्डन ठाण्यात किल्लेकर्स  संस्थापिका  मयुरा वाघोळकर ,पाडळे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग ६ व्या वर्षी इको फ्रेंडली  मातीचे किल्ले कार्यशाळा  वसंत विहार, क्लब ग्राउंड, ठाणे येथे दिमाखात संपन्न झाली. यावेळी श्री तरे यांच्या हस्ते किल्लाचे भूमिपूजन करून,  अमाप ऊर्जा आणि उत्साह असणारया बालमावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जय अश्या घोषणा देत मुलांनी  माती ओली करून मळून, थापून ,लिंपण करून मातीचे किल्ले कार्यशाळेत  सकाळी ९ ते सायं ५ वा वेळेत ९० मुलांच्या ९ गटांनी प्रतापगड, पन्हाळा, कोंडाणा, मुरुड  जंजिरा, सिंधुदुर्ग, राजगड, रायगड, सुवर्णा दुर्ग असे ९ किल्ले उभारले. या कार्यशाळेत ठाणे महानगर परीसरातील १० शाळानं मधून १३ ते १४ वयोगटातील इयत्ता ७ वी, ते ९ वीतील ९० मुले ,मुली व उत्तेजन, स्फूर्ती देण्यासाठी १५ शिक्षक, मुलांचे पालक सहभागी झाले होते. आयोजकांतर्फे माती आदी साहित्य देण्यात आले. इंतिहास तज्ज्ञ संदीप दहिसरकार यांनी किल्लाचे परीक्षण करून, पहिला एस बी फिरके स्कूल पन्हाळगड, दुसरा ज्ञानदीप मुंब्रा मुरुड जंजिरा,तिसरा  श्रीरंग विद्यालय सिंधुदुर्ग,तर  विजेता शिवराज शैलेंद्र ग्रुप डोंबिवली, सायलेंट किलर म्हाडा ठाणे, जानवी खरार कळवा असा निकाल जाहीर केला,
सायं ५ ते ६:३० वा मातीच्या किल्लांचे प्रदर्शन व दांडपट्टा, तलवार बाजी व लाठी काठी ,मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक,संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी श्रीमंत रोहितराजे देशमुख पवार, राजकुमार महाराज-सुरगाणा स्टेट (नाशिक) यांचे आगमन झाले. किल्लेकर्सने तुतारीची सलामी, ढोल आणि ताशा वाजवून मानाचा फेटा बांधून महाराजांचे  पारंपरिक स्वागत केले. महाराजांनी मुलांनी केलेले किल्ले बघितले व मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप शाबासकी दिली. मुलांनबरोबर सवांद साधला आणि इतिहासाबद्दल असलेली आपुलकी जाहीर केली. महाराजांच्या हस्ते मर्दानी खेळाचे उद्घाटन केले
तर सायं ७ ते ९   कोरम मॉल, ठाणे येथे किल्लेकर्स तर्फे जग प्रसिद्ध ग्रुप मुंबई मॉम्स व किल्लेकर्सच्या सहयोगाने वय वर्ष ३० पुढील वयोगटातील आधुनिक ३० महिलांचा पारंपारिक  फॅशन शो, दिमाखदार पार पडला एक पारंपरिक पण आधुनिकतेची झालर असणारा सौंदर्याची उत्क्रांती असणारा फॅशन शो सादर केला. या वेळी रॅम्प वर सगळ्या आजच्या डिजिटल जनरेशनच्या  आई कितीही प्रोफेशनल असली तरी तीच एक सुजाण नागरिक घडवू शकते म्हणून विविध कार्य क्षेत्रातल्या महिला डॉक्टर, फोटाग्राफर,आर्किटेक, फॅशन डिझायनर  आयांनी हजेरी लावली. इतिहास व ऐतिहासिक स्थळे आणि गड किल्ले याची माहिती पुढच्या पिढीला का हवी हा विशेष संदेश देण्यासाठी हा वॉक आयोजित केला होता पहिल्यांदाच रॅम्प वर अतिशय आत्मविश्वासाने चालल्या. या वेळी महिलांना एका राजकुमारां बरोबर चालायची संधी मिळाली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रमुख अतिथी श्रीमंत रोहितराजे देशमुख पवार, राजकुमार महाराज-सुरगाणा स्टेट (नाशिक) यांच्या सत्कार किल्लेकर्स  संस्थापिका  मयुरा वाघोळकर पाडळे  यांनी मानाची किल्लेकर्स ट्रॉफी देऊन, - केला यावेळी महाराजांनी प्रेक्षकांशी सवांद साधला व इतिहास हा कसा पुढच्या पिढीला शिकवू शकतो हे सांगितले तसेच गड किल्ले यांचे जतन  करणे व त्या बदल माहिती करून घेणे ही तितकंच महत्वाचे आहे हे त्यांनी सांगितले.
      फॅशन शो मध्ये पहिली प्रेमा सालडाना ठाणे. दुसरी शिल्पा मेहता कांदिवली,तिसरी  सविता शर्मा बोरीवली विजयी झाल्या यांना क्राउन ट्रॉफी व सर्टिफिकेट्स महाराजांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.ऑनलाईन  चित्रकला स्पर्धेमध्ये अनुक्षा भद्रा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ठाणे, जय प्रीत पांचाळ स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल बोरवली, मयूर बंडघर गारुडीया सोसायटी ठाणे, ऑनलाईन  फोटोग्राफी स्पर्धा सोनिका अग्रवाल फोटो जामा मस्जिद अशोक देवगन फोटो  हम्पी, अभय कस्तुरे फोटो थ्री ट्वेंटी इमेज, ऑनलाईन  कविता स्पर्धा सीमा बडेकर सिंधुदुर्ग फ्रॉम होम ऑफ स्कूल टीचर ,प्रथमेश जांभुळकर अंधेरी. एक सोसायटी एक किल्ला या स्पर्धा सुद्धा घेतल्या गेल्या. अनेक मुलांनी यात भाग घेतला. स्पर्धेचे विषय होते - मी पाहिलेले ऐतिहासिक स्थळे,किल्यांची आत्मकथा, किल्ले भाड्यानी दिलेले पाहिजेत का नाही ?या  सगळ्या स्पर्धकांच्या बक्षीस समारंभ पार पडला, तेव्हा मुलांना ट्रॉफी व सर्टिफिकेट्स देऊन गौरवण्यात आले.
      यावेळी कल्पतरू समूहाचे सिनियर मॅनेजमेंट मधली मंडळी हजार होती - अनुप वर्मा, अजित अगरखर, राजेंद्र तावडे.तसेच सह संस्थापक लाव्यू हिस्टरी.इंडिया. कॉम संस्थापक अक्षय चव्हाण याचे  संदीप दहिसरकर पुरातत्व व इतिहासकार, सतीश देसाई जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि समीर देसाई ठाणे शहर अध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ,दत्ता चव्हाण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड , कल्पतरू व्ही.पी., वाणिज्य प्रमुख व प्रकल्प प्रमुख, के कुमार- अध्यक्ष वसंत विहार सीएचएस आणि संस्थापक पुरोगामी ठाणे निवासी संघटना, साक्षी शंकर परब ,डॉ राज आणि ज्योती परब ,अखिल भारतीय कला,क्रीडा व सांस्कृतिक अकादमी (ISO) यांचे संस्थापकउपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला मयुरा वाघोळकर पाडळे यांनी आभार मानले असे आपल्या प्रसिद्धीपत्रकात किल्लेकर्स संस्थापक मयुरा वाघोळकर पाडळे यांनी म्हटले आहे 

Post a comment

 
Top