0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

राजभवनातून 8.30 वा राज्यपाल महोदयांचा फोन आला, त्यांनी भेटायला बोलावले आहे, कशासाठी बोलावले ते माहित नाही. राज्यपाल महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी बोलावलं त्यामुळे आम्ही निघालो, कारण काय ते माहित नाही अस मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मांडले  आहे.  दरम्यान, होणार-होणार म्हणता-म्हणता महाशिवआघाडीचे स्वप्न धूसर झाले आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेली मुदत संपली असून आता पुढे काय हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रापुढे आहे. महाराष्ट्रावर सद्य:परिस्थितीत राष्ट्रपती राजवटीचे सावट आहे, यात कोणाचेही दुमत नाही. तरीही शिवसेनेला अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र येईल आणि आपण सत्ता स्थापनेचा दावा करू अशी आशा आहे.

Post a comment

 
Top