0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दुसऱ्याच कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थगिती  देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. आरेला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम सुरु राहणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी केली. आत्ताही अंधारात काही झाडं तोडल्याची माहिती मिळत आहे. आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊपर्यंत आरेतील एक पानही तोडलं जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Post a comment

 
Top