0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
प्लास्टिक बंदी कारवाई अंतर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिना अखेर ठाणे महानगर पालिकेने प्लास्टिक वापरा विरोधात कडक कारवाई केली होती. या कारवाईत ५.७ टन प्लास्टिक जप्त करण्यात आला असून १ लाख ९० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तुंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक याबाबत अधिसूचना प्रसिध्द केल्या होत्या. सदर अधिसूचनांच्या अंमलबजावणीकरिता ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रतिबंधीत प्लास्टिक व थर्माकोल वस्तुंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक करणाऱ्या संस्था, आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात नागरिकांकडून एकूण २०.५ प्लास्टिक संकलन करण्यात आले. ७२ रहिवाशी संस्था आणि सामाजिक संस्थांच्यावतीने ७२ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दंडापोटी ९ लाख ४० हजार एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच, सन २०१९-२० या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेर पर्यंत आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून ५.७ टन प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे. ३०० रहिवाशी संस्था आणि सामाजिक संस्थांच्यावतीने २८९ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दंडापोटी १ लाख ९० हजार एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top