0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |

राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले. तसेच क्यार वादळाचाही काही भागांमध्ये परिणाम झाला. या तुफान पावसामुळे पिकांचे तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात पाठवलेले पाच सदस्यांचे पथक आज गुरुवारी मुंबईमध्ये दाखल होत आहे. त्यानंतर या पथकाची तीन पथकांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. यानंतर हे पथक विविध भागातील नुकसानीची 22 ते 24 नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. यानंतर केंद्राकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल.

Post a comment

 
Top