0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुक्यात नवरात्री असो किंवा लग्नसरार्इ अशा मनोरंजनात्मक कार्यक्रम उपक्रमात संगीतकार म्हणून विजय धीवर यांचे नाव सध्या चर्चेत आहे.विजय धीवर हे नाव राहिले नसून संगीतकार म्हणून एक ब्रँड म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.गावातून शहरात आणि शहरातून जिल्हयात त्यांचा प्रत्येक भक्तगीते,कोळीगिते,धार्मिक गिते,तसेच नवनिर्वात मंनोरंजनात्मक गाण्याला संगीतकार म्हणून त्यांची साथ मिळाली आहे.मोठया मेहनतीने आणि पराकष्टाने त्यांनी यशस्वी शिखर गाठले आहे.
     मोठ मोठे उद्दयोग समुहापासून आमदार,खासदार यांच्या येणार्‍या प्रत्येक गाण्याला गायकाबरोबर त्यांच्या म्युझिकची झंकार न नाचनार्‍याला ही नाचण्यास भाग पाडत आहे.पैशासाठी विजय धीवर यांनी कधीच काम हाती घेतले नाही केवळ माणसांच्या हृदयात आपल्या बोटातील जादूर्इ थाप निर्माण करण्याची त्यांची धरपड त्यांना आज गरूड शिखरावर घेऊन गेली आहे.अवघ्या लहान वयापासूनच त्यांची कला कलाकार गीत,गायकांच्या जोडीला असून संपुर्ण आयुष्य केवळ म्युझिकला दिले असल्याचे त्यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.आनंद शिंदे,आदर्श शिंदे,सार्थक शिंदे तसेच मोठ मोठे चित्रपट सृष्टीतील गायकांच्या समवेत त्यांनी आपल्या कलेची जादूर्इ कला सादर केली आहे.ठाणे जिल्हयातील मुरबाडचे नाव जगाच्या नकाशावर उमटावे त्यासाठी माझी धरपड सुरू आहे कारण कलेला जात नसते आणि कला ही सर्वकाळ राहते अशी भावना त्यांनी आमच्याशी बोलतांना व्यक्त केल्या आहेत.त्यांनी आजपर्यंत शेकडो गाण्यांना संगीतकार म्हणून साथ दिली अशा प्रत्येक गाण्याला नागरिकांनी भरघोष असा प्रतिसाद दिला आहे.त्यांचे सध्याचे युटयुब वर म्युझिक झळकत असून विजय धीवर नावाचे अकाऊंट ला सब्सक्रार्इबर वाढतांना दिसत आहेत.त्यांच्या चाहत्यांसाठी लवकरच त्यांचे नवे गीत येणार असल्याचे सांगण्यात आले असून नागरिक त्यांच्या गाण्याची व मनाला भिडून जाणारी जादूर्इ म्युझिकची प्रतिक्षा करत असल्याचे बोलले जात आहे अशा संगीतकारला त्यांच्या पुढिल वाटचालीस युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी तसेच स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राकडून मनपुर्वक शुभेच्छा.

Post a comment

 
Top