0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
 “ म्हणतात ना शेवट पर्यंत जिद्द,चिकाटी,आत्मविश्‍वास,आणि जनसामान्यांचा आशिर्वाद असे पर्यंत अपयश आपल्या समोर उभा राहत नाही हे झालेल्या विधानसभा निवडणूकीत मनसेने डोंबिवली शहरात दिलेल्या उमेदवाराच्या विजयाने सिध्द केले आहे.''
महाराष्ट्राची अस्मिता ही कायम संस्कृतीमध्ये राखली पाहिजे कारण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारशैलीतून भविष्यातील कुशल महाराष्ट्र महाराजांच्या प्रेरनेने घडवला पाहिजे या दृष्टिकोनातुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख श्री राज ठाकरे यांच्या निर्भिड वक्तव्यातुन तमाम मराठी बांधवांना मराठी असल्याचा अभिमान असल्याचा गर्व होत आहे.परिवर्तनाचे धडे आपण आजपर्यंत एैकले होते परंतू त्या परिवर्तनाला वास्तव्यात आणणारे राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये काय परिवर्तन असते जे अख्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
मनसे नेहमी गोरगरिबांच्या न्याय हक्कांसाठी पुढाकार घेत आली आहे.जसे ठाणे जिल्हयात अविनाश जाधव यांनी गेल्या काही दिवसापुर्वी एका महिलेल्या बाळाला आर्इकडे सुपुर्त करण्यात माणूसकीचा सलोखा जपला.तर अलीकडे विधानसभा निवडणूका झाल्या त्यामध्ये राज ठाकरे यांचे विश्‍वासू आणि मदतीला धावणारे डोंबिवलीचे राजू पाटील यांनी विधानसभेच्या रणधुमाळीत मनसेला विजयी करत आमदार म्हणुण जिंकले.
त्या अगोदरही राजू पाटील ही व्यक्ती सामाजिक कार्यशैलीतून काम करतच होती परंतू राजसाहेबांचा विश्‍वास आणि जनतेची साथ त्यांना आमदार बनवून समोर आणले.युवकांचे आधारस्तंभ म्हणून आमदार राजू पाटील असून नेहमी प्रत्येकांच्या सुखदुखःत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
सुखःत तर सगळेच येतात परंतू दुखःच्या प्रसंगी कमी असतात त्यावेळी राजू पाटील हे नाव पुढे असते असे एका मनसैनिकांनी आमच्याशी बोलतांना आपले विचार स्पष्ट केले आहे.राजसाहेब ठाकरे यांचे जवळचे सर्वच आहेत परंतू जनता ही खरी ताकद आज मनसेची आहे हे या निवडणूकीतून सिध्द झाले आहे.आमदार राजू पाटील यांनी जनतेच्या पिढा आपल्या आहेत त्यांनी प्रत्येक समस्यांपासून अलिप्त करण्याचा मानस मनात बाळगला असून राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आशिर्वादाने नाशिकचे परिवर्तन तेथे केले आता ठाणे जिल्हयातील डोंबिवली मध्ये नाशिक घडवणार असल्याची सांगितले आहे.
'' जसे सर्य उगवणे कधी थांबत नाही तसेच मनसे कधीच अपयशानंतर थांबत नाही कारण अपयशातच यश हे आहेतच त्यामुळे आज मनसेचा एक आमदार आला उद्दया कशावरून शंभरचा आकडा होणार नाही असे आमदार राजू पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोालतांना सांगितले.''
त्याचबरोबर ते असेही म्हणाले माझ्याकडे काय नव्हतं तरी पहिले एवढं केले आता तर राजसाहेबांचा आणि तमाम जनतेच्या आशिर्वादाने आमदार झालो तेव्हा आता किती करणार हे पाहतच रहा अशा प्रतिक्रिया आमच्याशी बोलतांना दिल्या.


Post a comment

 
Top