0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - उल्हासनगर |
संपुर्ण ठाणे जिल्हयात उल्हासनगर येथील श्‍वानांवर (कुञ्यांवर) प्रेम करणारे यशस्वी डॉक्टर सुनिल पाटील( Dr.Sunil Patil) हे ओळखले जातात.त्यांच्याकडे संपुर्ण जिल्हयातून कुञ्याच्या उपचारासाठी येत असून त्यांना श्‍वानांची परिपुर्ण माहिती आहे.त्यांच्या नावातच निल आहे म्हणून त्यांच्याकडे येणार्‍या श्‍वानांच्या आजाराला ते निल करूनच टाकतात त्यामुळे त्यांच्याकडे श्‍वानांच्या उपचारासाठीचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे.
आजारी अपघात झालेल्या श्‍वानांवर (कुञ्यांवर) डॉ.सुनिल पाटील हे यशस्वीरित्या उपचार करतात. श्‍वानांला (कुञ्याला) बघताच त्याला काय आजार आहे,त्यावर काय उपाय केला पाहिजे,हे डॉ.सुनिल पाटील यांना माहित असतं.सध्याच्या युगात माणसं आपला आजार हे तोंडाने डॉक्टरांना सांगतात मात्र मुका जनावर काय सांगणार,कसे सांगणार मात्र त्यांची नस नस ओळखणारे त्यांना काय आजार झाला आहे त्यावर काय उपाय केला पाहिजे हे डॉ.सुनिल पाटील यांना नक्कीच समजते.गावा गावात जाऊन पाळीव कुञ्याला वेळीत उपचार डॉ.सुनिल पाटील हे देत असुन जणू त्या मुक्या जनांवरांसाठी देवदुतच आहेत.त्यांच्या या कार्याला युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेल कडुन अभिनंदन व्यक्त केला जात आहे.

Post a comment

 
Top