0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
गोव्यानंतर आता लवकरच मुंबई ते सुरत क्रूझ सेवा सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सुरतलाही क्रूझने प्रवास करता येणार आहे. ही सेवा येत्या 5 नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहे. वांद्रे-वरळी सीलिंक येथून ही सेवा सुरु होईल. एसएसआर मरीन सर्व्हिसेज मेडेन क्रुझ शिपकडून ही सेवा सुरु करण्यात येत आहे.येत्या 5 नोव्हेंबरला पहिली क्रूझ मुंबईहून सुरतसाठी सुटण्याची शक्यता आहे. तसेच या क्रूझमध्ये एका प्रवाशाची तिकिट 3 ते 5 हजार असेल. मुंबई ते सुरत सेवा प्रत्येक आठवड्याला सुरु राहील, असंही सांगितलं जात आहे.

Post a comment

 
Top