0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – जायकवाडी, पैठण |
पैठण परिसरातील नाथनगर जायकवाडी येथील अपंग तथा ओंकार मूकबधिर निवासी विद्यालय येथे श्री संत एकनाथ महाराज समाधी उत्सवानिमित्ताने  दि. 22 शुक्रवार रोजी शाळेतील अपंग तथा मूकबधिर विद्यार्थ्यांना श्री ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने लाडूंचा प्रसाद वाटप करून त्यांचे जिवन गोडमय व्हावे, अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या. नशिबी अपंग व मूकबधिर आल्यामुळे जिद्दीने जिवन जगण्याचा निश्चय केला असल्याचे यावेळी काही अपंग विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून समाजान सदैव आमच्या पाठीशी उभे राहून आमची जगण्याची उमेद वाढवावी, असेही सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीख, राजू लोहीया, विष्णू ढवळे, राजेंद्र बडसल, नवनाथ वडेकर, भाऊसाहेब पठाडे, भिमसिंग बुंदिले, शिवाजी तुपे, धनराज चितलांगी, केदार मिरदे, मुख्याध्यापिका अपर्णा हजारे, सुनिता कुलकर्णी, सुवर्णा मिसाळ, श्रीमती कांबळे, श्रीमती ठाणगे, श्रीमती माहोरे, रमेश जाधव, बाबासाहेब शिरसाट, ञिंबक दहिफळे, माऊली फटांगडे, आव्हाड, आदी उपस्थित होते. निवासी असलेल्या  या प्रशालेत पहिली ते आठवी पर्यंतचे मराठी माध्यमातून शिक्षण विनामूल्य दिले जाते. जवळपास शंभर विद्यार्थी या शाळेत असून उसतोड, मजूर व शेतक-यांच्या मुलांचा यात समावेश आहे. महाविर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली 1996 पासून हि शाळा चालविली जाते.

Post a comment

 
Top