0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |

भाजपमधील 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहे. मात्र मी त्यांचे नाव फोडणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतील,असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले.आम्ही मेगाभरती करणार नाही तर आमच्याकडे मेरीटने भरती होईल, असेही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्तास्थापने संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a comment

 
Top