0
BY -  प्रणव भांबुरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी कल्याणात शिवसेनेने कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. अवकाळी पावसामूळे कल्याण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून त्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने शिवसेनेतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार आणि बागायतदारांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शिवसनेतर्फे करण्यात आली. दरम्यान शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसिलदार दिपक आकडे यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, छाया वाघमारे, रमेश जाधव, जयवंत भोईर, मोहन उगले, रवी पाटील, अरविंद मोरे, संजय पाटील, सदानंद थरवळ, तात्यासाहेब माने, कविता गावंड, रवींद्र कपोते आणि कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते


Post a comment

 
Top