0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
विविध सामाजिक-सांस्कृतिक-सर्जनशील कार्यांमध्ये सक्रिय असलेल्या अग्रगण्य संस्था अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, ठाणे याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्लब हाऊस, वन हिरानंदानी पार्क, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे दिवाळी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
         आपल्या भगवान श्री अग्रसेन जी महाराज यांनी समाज व लोकहितासाठी अनेक योजना आखल्या-प्रारंभ केल्या आहेत, त्यांनी दाखविलेल्या या पुण्याईच्या पारंपारिक मार्गावरुन आम्ही संस्थेच्या वतीने वाटचाल करीत आहोत, असे संस्थेचे अध्यक्ष महेश बन्सीधर अग्रवाल समारंभात मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करतांना म्हणाले. त्यांनी सदारप्रसंगी सर्वांना दिवाळीच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमात संस्थेचे मुंबई अध्यक्ष शिवकांत खेतान, ठाण्याचे अध्यक्ष कैलाश गोयल, सचिव सुभाष अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोहळ्यामध्ये संस्थेला नेहमी मदत करणा-या अति-खास पाहुण्यांचे सत्कारही करण्यात आले.
       या कार्यक्रमामध्ये गीत-संगीत, करमणूक यांनी भरलेल्या संध्याकाळचे सादरीकरण करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेने गेल्या काही वर्षात घेतलेल्या अनेक कार्यक्रमांची झळदेखील सदरप्रसंगी सादर करण्यात आली.

Post a comment

 
Top