0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्ष आता संपलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार आज स्थापन होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर शपथ घेणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदानात हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्याची नावे समोर आली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, कॉंग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. हे सहा मंत्री आज शपथ घेणार असले तरी कोणाला कोणते खाते मिळणार याबाबतचा तपशील समोर आलेला नाही.

Post a comment

 
Top