0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण तालुक्यतील बल्याणी येथे एका अनोळखी मृतदेह आढळला असून या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदर मृतदेह एका अज्ञात स्त्रीचा असून कोणत्यातरी अज्ञात कारणावरून तिचा खुन करण्यात आला असून तिच्यावर कोणत्यातरी प्रकारचे द्रवपदार्थ व कपडे टाकून  पेटवून देऊन पुरावे नष्ट करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.बल्याणी टेकडीवर रस्त्याच्या कडेला अकील अहमद शहा,रा.बल्याणी ता.कल्याण याचे दुकान आहे त्या दुकानासमोरील कचर्‍याच्या ढिगार्‍याच्या बाजुला खडड्यात प्रथम खबर देणारा अकील अहमद शहा याला एक मृतदेह जळाल्याच्या अवस्थेत दिसले त्याने तात्काळ पोलिसांना फोन करून सदरची माहिती दिली.घटनास्थळी पोलिस हजर झाले  चौकशी करून तात्काळ तपास सुरू केला.सदर तपासीत ती स्त्री असल्याचे सांगण्यात आले असून तिचा खुन करून तिला पेटवले आहे असे सांगण्यात आले.तिचा अंदाजे वय 30 ते 35 वर्षीय असल्याचे सांगून कल्याण पोलिस ठाण्यात भादविस कलम 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हयाचा अधिक तपास कल्याण पोलिस ठाण्याचे पेालिस  बालाजी पांढरे,पोलिस उपनिरीक्षक सुर्वे,पो.हवा सातपुते,पोना.टी.एम.पाटील,पोना.गायकवाड करित आहे.

Post a comment

 
Top