0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उद्या(शनिवार) दुपारी तीन वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात ही भेट असून, त्यात सत्तास्थापनेचा कोणताही विषय नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असून त्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उद्या दुपारी तीन वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली असून त्याला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला आहे.


Post a comment

 
Top