0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ज्या देशात- ज्या काळामध्ये चार्तुवर्ण्य मनुवाद्यांची वर्णव्यवस्था समाजाला पोखरत होती. त्या काळात दोन महानायकांनी त्यांच्याविरुद्ध लढा दिला. एक पेरीयार रामास्वामी आणि दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! त्यांना वैचारीक दहशतवादी म्हणणारा हा रामदेव;त्याला बाबा कोण म्हणतं, हे मला माहित नाही. ज्याची अक्कल ही गुडघ्यात आहे. त्याने एकतर माफी मागावी; नाहीतर त्याला महाराष्ट्रात पाऊलदेखील ठेऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 

रामदेव कोणत्या विचारांनी घडला आहे, त्याच्याशी मला काही देणेघेणे नाही. पण, या देशातील स्त्रिया, या देशातील तत्कालीन मनुवाद्यांनी ठरविलेला शूद्र वर्ग , येथील ओबीसी, येथील एसी, एसटी, व्हीजेएनटी, येथील कामगार, येथील आर्थिक धोरणे, कोणामुळे अधोरेखीत झाली; तर, त्यांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर !! ते एका  जातीचे नव्हते. तर ते संपूर्ण भारतीय समाजाचे होते. कामगारांना आठ तासच काम मिळाले पाहिजे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच ठरविले आहे. जे संविधान तुम्हाला आणि आम्हाला सुरक्षित ठेवते, ते बाबासाहेबांनीच दिले आहे. पेरीयार रामास्वामी यांनी जातीनिर्मूलनाचे काम केले आहे. त्यामुळेच रामदेवने शहाणपणा दाखवून माफी मागितलेली बरी; अन्यथा, त्यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, असे डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे.

Post a comment

 
Top