0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने हा वाद निर्माण झाला. यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, जर माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी' या सर्वांनंतर सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अमिताभ बच्चन यांनी औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का? असा प्रश्न विचारला जात होता. काहींनी बिग बींनी याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली होती. यानंतर बिग बींनी माफी मागितली आहे.

Post a comment

 
Top