0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
बृहन्मुंबई पोलिसांच्या स्वरतरंग 2019 या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.पोलीस जिमखाना मरिन ड्राईव्ह येथे आयोजित स्वरतरंग कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, सह पोलीस आयुक्त नवल बजाज,विनयकुमार चौबे, उपायुक्त एन. अंबिका आदी उपस्थित होते. आयुक्त श्री. बर्वे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे  स्वागत केले. या स्वरतंरग कार्यक्रमात चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या कलाकारांनी सादरीकरण केले. तसेच विविध गाण्यांवर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी नृत्य व गीते सादर केली. या कार्यक्रमास अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अभिनेता अभिजित खांडकेकर व मृण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालन  केले.


Post a comment

 
Top